महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अंतर्गत मोठी पदवाढ करण्यात आली आहे. यापूर्वी 5,707 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली होती, आता त्यामध्ये 11,010 पदांची वाढ होऊन एकूण 16,717 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.या मेगा भरतीमध्ये लिपिक-टंकलेखक (3,966 पदे), अधिपरिचारिका (3,911 पदे), ग्राम अधिकारी/तलाठी (1,840 पदे), शिल्पनिदेशक (1,388 पदे) आणि सहायक कृषी अधिकारी (1,203 पदे) यांसारख्या 27 विविध संवर्गांचा समावेश आहे. नव्याने अर्ज सादर करण्यासाठी किंवा विकल्प देण्यासाठी 13 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2026 या कालावधीत लिंक खुली राहील. तसेच, पूर्व परीक्षा आता 3 जानेवारी 2027 ऐवजी 24 जानेवारी 2027 रोजी ऑफलाईन (OMR) पद्धतीने घेतली जाईल. उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत 1 वर्षाची सवलत देण्यात आली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
•एकूण पदे: 16,717 पदे
•शेवटची तारीख: 27/11/2026