वारसाला पीएम किसान यौजन सुरू करणे | MahaForms
PM किसान वारस नोंद (प्रस्तावना)
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये (प्रत्येकी 2,000 रुपयांचे तीन हप्ते) दिले जातात. जर लाभार्थी शेतकऱ्याचे निधन झाले, तर त्याच्या पश्चात त्यांच्या कायदेशीर वारसाला या योजनेचा लाभ मिळू शकतो. यासाठी वारसाने जमीन स्वतःच्या नावावर करून संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात योग्य कागदपत्रांसह ऑफलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. हा फॉर्म महाफॉर्म्स (mahaforms.in) पोर्टलवर मोफत उपलब्ध आहे.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी
मयत शेतकऱ्याच्या वारसाला PM किसान योजना सुरू करण्यासाठी pm-kisan-application.pdf मधील माहितीनुसार खालील कागदपत्रे अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे:
- मयत व्यक्तीचे आधार कार्ड आणि मृत्यू प्रमाणपत्र.
- मयत व्यक्तीच्या नावावरून जमीन वारसाच्या नावावर आल्याचा अधिकृत फेरफार उतारा (वारस नोंद).
- वारसाच्या (अर्जदाराच्या) नावावरील जमिनीचा अद्ययावत 7/12 उतारा आणि 8-अ उतारा.
- अर्जदार पती-पत्नी दोघांचे आधार कार्ड झेरॉक्स (एका पानावर).
- बँक पासबुक आणि रेशन कार्ड झेरॉक्स.
- फार्मर आयडी (शेतकरी ओळखपत्र).
अर्जासोबत जोडायची आवश्यक प्रमाणपत्रे
फक्त कागदपत्रे देऊन चालत नाही, तर अर्जासोबत तीन महत्त्वाची प्रमाणपत्रे (ज्याचे नमुने महाफॉर्म्सवर दिलेल्या पीडीएफमध्ये आहेत) जोडून द्यावी लागतात:
- स्वयंघोषणापत्र (5 रुपये तिकीट): अर्जदाराने आपण नोकरदार/पेन्शनधारक नसल्याचे आणि कुटुंबातील इतर कोणीही लाभ घेत नसल्याचे स्व-घोषणापत्र 5 रुपयांचे तिकीट लावून देणे आवश्यक आहे.
- प्रतिज्ञापत्र: अर्जदाराला अटी शर्ती मान्य असल्याचे प्रतिज्ञापत्र लिहून द्यावे लागते. यामध्ये अर्जदार माजी/आजी आमदार, खासदार, महापौर नसून कोणताही आयकर (Income Tax) भरत नसल्याची हमी द्यावी लागते.
- पात्रता व चौकशी अहवाल: यावर ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), ग्रामविकास अधिकारी (ग्रामसेवक) आणि कृषी सहाय्यक यांच्या संयुक्त स्वाक्षऱ्या आणि स्थानिक चौकशी अहवाल आवश्यक असतो.
अर्ज कुठे व कसा करायचा?
प्रथम मयत शेतकऱ्याच्या जमिनीची वारस नोंद आपल्या नावे करून घ्या. त्यानंतर 7/12 व 8-अ उतारे काढा. महाफॉर्म्स (mahaforms.in) पोर्टलवरून pm-kisan-application.pdf फॉर्म डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा. फॉर्ममध्ये सर्व माहिती भरून, वरील अधिकाऱ्यांच्या सह्या घेऊन जवळच्या CSC केंद्रातून अर्ज ऑनलाइन भरणे गरजेचे आहे त्यानंतर हा संपूर्ण प्रस्ताव आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जमा करा.
टीप: या लेखातील माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. अंतिम खात्रीसाठी अधिकृत जाहिरात व मूळ अधिसूचना पाहावी.